EXCLUSIVE: मुंबई खड्डेमुक्त करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत मुंबईकरांना महत्त्वाचं आश्वासन दिलंय.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झी24 तासच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी गणपतीची आरती केली. पहिल्यांदाच राज्यातील धरणं पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे गणपतीची ही कृपा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
'गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतोय. मला वाटत नाही राजकीय वातावरण तापलंय. निवडणुका अद्याप जाहीर झालेले नाही. प्रत्येक पक्ष आपआपली तयारी करत असतो. आम्ही सरकार स्थापन झाल्यापासून काम करतोय.'
'शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यापासून संथ झालेल्या प्रोजेक्टला चालना देतोय. सर्व प्रोजेक्ट वॉररुम मध्ये घेतले आहेत. प्रोजेक्ट वेळेवर होण्यासाठी प्रयत्न करतोय. ज्याचा लोकांना लवकर फायदा होतो.'
'मुंबईतील कोस्टल रोड, मेट्रोचं काम सुरु आहे. हे प्रकल्प वेळेत सुरु करण्यासाठी वॉर रुममध्ये घेतले आहेत.'
'गणेशोत्सव सुरु आहे, नवरात्र येईल त्यानंतर दसरा आहे. त्यामुळे तेव्हा बघू.'
'सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तांना बोलवलं. मुंबईतील रस्ते डागडुजी करण्याऐवजी काँक्रीट करण्यासाठी सांगितलं. 'खड्डेमुक्त मुंबई करण्याचं काम आम्ही करणार आहोत. शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लोकं खूश आहेत. उत्सव धुमधडाक्यात साजरे करत आहेत. विकास करायचा आहे. पर्सनल काही अजेंडा नाही.'
'मोदी साहेबांनी सांगितलं आहे. काही कमी पडू देणार नाही. राज्याला पुढे न्या. गती द्या. त्याप्रमाणे काम करतोय. पाहा दोन महिन्यात किती निर्णय घेतले.'