मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर अनेक मोठ्या घोषणा केल्या. विनाविलंब कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान तसेच वीज दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या अनेक निर्णयांसह  एका आमदाराला छप्पर फाड गिफ्ट दिलंय. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या आमदाराच्या मतदारसंघातील तब्बल 60 गावांना मोठा फायदा होणार आहे. (cm eknath shinde give fund for brahmagavan upsa irrigation scheme in paithan after mla sandipan bhumare follow up 60 villages will benefit)


मुख्यमंत्र्यांकडून उपसा जलसिंचन योजनेला निधी मंजूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी पैठणमधील उपसा जलसिंचन योजनेला निधी मंजूर केला आहे. आमदार संदीपान भुमरे यांनी पैठणमधील ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेसाठी सातत्यांने पाठपुरावा केला होता. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास 890.64 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे थेट 60 गावांना फायदा मिळणार आहे.


संदीपान भुमरे यांच्या पाठपुराव्याला यश 


संदीपान भुमरे या योजनेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे तगादा लावला होता. अखेर शिंदेंनी ग्रीन सिग्नल दाखवल्याने भुमरे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना भुमरे यांनी कॅबिनेटपदावर पाणी सोडत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. शिंदेंना पाठिंबा देणारे ते पहिलेच मंत्री ठरले होते.