मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा
CM Eknath Shinde Meets Sharad Pawar?: राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतल्याची चर्चा सुरु सोशल मीडियावर सुरु आहे.
मुंबई : CM Eknath Shinde Meets Sharad Pawar?: राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. या भेटीबाबत एक जुना फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भेटीची आता चर्चा होऊ लागली आहे.
एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 4 जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचे म्हटले होते. याचीच सुरुवात त्यांनी शरद पवार यांच्यापासून केल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले येत होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, समोर आलेला फोटो हा जुना आहे. त्यामुळे त्यांची भेट झाली की नाही, याची माहिती मिळू शकलेले नाही. दरम्यान, ही अफवा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करुन स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळीच मुंबई महानगरपालिकेमधील आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते दिवसभर मुंबईमध्येच होते. याच दरम्यान त्यांनी सायंकाळी शरद पवार यांच्या घरी अचानक भेट दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांनी भेट घेतलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्टवर कोणीही विश्वास ठेवू नका. तसेच अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.