Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातला कार्यकर्ता, नेता हरवलेला नाही. आपल्या पाठिशी असणाऱ्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाणं असो, किंवा त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणं असो, एकनाथ शिंदे कायमच आघाडीवर असतात. यावेळीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विचार न करता एका बाईकस्वारासाठी धाव घेतली. (CM Eknath shinde rushed to help Bike rider video viral )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
(Western Express Highway) वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विलेपार्ले (Vileparle) येथे असतानाच एका तरुणाच्या Bike नं पेट घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्याचवेळी मुऱख्यमंत्री आणि त्यांच्या वाहनांचा ताफा याच रस्त्यावरून जात होता. 



औरंगाबादहून मुंबईला (Aurangabad Mumbai) परतताना मुख्यमंत्री याच मार्गानं विमानतळाहून (Airport) घराकडे निघाले होते. वाटेतच त्यांना तरुणाच्या बाईकनं पेट घेतल्याची दृश्य दिसली. कशाचाही विचार न करता त्यांनी आपला प्रवास थांबवत तरुणाची विचारपूस केली. 


जीव वाचला ते मोठं काम... काळजी करु नकोस, आपण गाडी दुसरी घेऊ असं म्हणत त्यांनी तरुणाला धीर दिला. पेटत्या बाईकपाशी जाऊ नकोस, असं ते तिथून निघताना काळजीपोटी म्हणाले. शिवाय संबंधित विभागाला तरुणाची मदत करण्याचे आदेशही दिले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला धीर पाहून काही क्षणांसाठी नेमकं काय घडलं हेच त्या तरुणाला कळेना.