प्रशांत परिचारकांविरोधात शिवसेनेची घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांनी दिलं हे स्पष्टीकरण
प्रशांत परिचारिकांच्या मुद्यावरून शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी केली.
मुंबई : प्रशांत परिचारिकांच्या मुद्यावरून शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी केली. प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेना आमदारांची मागणी आहे. सैनिकांचा अवमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
तिकडे विधानसभेतही आज याच मुद्द्यावरून गदारोळ बघायला मिळाला. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरु झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आणखी हस्तक्षेप केला. परिचारकांनी केलेलं विधान चुकीचं असून त्याविषयी जो निर्णय घ्यायचा तो विधानपरिषदेत घेतला जाईल. त्यामुळे सभागृहांच्या अधिकारांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.