मुंबई : राज्यात प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. यावेळी पहिल्यांदाच राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी संकल्प अभियानाची शपथ देण्यात आली.
राज्य सरकारचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रदुषणमुक्त दिवाळीचा उपक्रम राबवण्यात आला. फटाक्यांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिवाळीत फटाक्यांमुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होणार यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मिशन दिवाळी अंतर्गत झी २४ ताससुद्धा प्रदूषणमुक्त दिवाळी हा उपक्रम दरवर्षी राबविले जाते.