पुढचे 15 दिवस सार्वजनिक ठिकाणांवर वाजणार लता दीदींचे गाणे, ममता सरकारची घोषणा
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लता दीदींना ममता सरकारने अनोखी आदरांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारने पुढचे 15 दिवस प्रत्येक सार्वजनिक ठिकाणांवर, ट्रॅफिक सिग्नलवर भारतरत्न लता मंगेशकर यांचे गाणे चालवण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारतरत्न लता मंगेशकर यांना ही अनोखी आदरांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ही दुखवटा
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारने देखील 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, "प्रसिद्ध भारतीय गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले, ज्यांनी आपल्या मधुर आवाजाने अनेक नेपाळी गाणी गायली आहेत. विलक्षण प्रतिभा असलेल्या दिवंगत लता मंगेशकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते."