मुंबई : आरे येथील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या मागणीला अनुमोदन दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो कारशेडसाठी आरे येथे वृक्षतोड झाली होती. त्यावेळी अनेकांनी येथे आंदोलन केलं होतं. 25 हून अधिक आंदोलकांवर यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.



माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरे येथे मेट्रोचं कारशेड बनवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला त्यावेळी शिवसेनेने देखील विरोध केला होता. पण तरी देखील या ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली होती. पण त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.