मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लावण्याबाबत कधीतरी विचार करावा लागणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर लावण्यासंदर्भात कुठेतरी लवचिकता असावी आणि राज्याचं उत्पन्न घटलंच तर कुठेतरी भरपाई करता यावी यासाठीच सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लावण्यास विरोध केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


पेट्रोल आणि दारूवर जीएसटीचे अधिकार राज्यांना दिले आहेत. म्हणजेच जर करातून पैशे कमी आले तर यामधून भरपाई करता यावे म्हणून याला विरोध करण्यात आला. राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी यावर रोड मॅप तयार करु नंतर यावर विचार करु असं म्हटलं आहे. जर पेट्रोलवर देखील जीएसटी कर प्रणाली आली तर यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकतं.