समृद्धी प्रकल्पावरून अखेर मोपलवारांची उचलबांगडी
समृद्धी प्रकल्पावरून मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. MSRDCच्या एमडीपदावरून मोपलवारांना अखेर हटवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विरोधकांपुढे अखेर फडणवीस सरकार नरमले आहे.
मुंबई : समृद्धी प्रकल्पावरून मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. MSRDCच्या एमडीपदावरून मोपलवारांना अखेर हटवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विरोधकांपुढे अखेर फडणवीस सरकार नरमले आहे.
तर दुसरीकडे आज विधानसभेत राधेश्याम मोपलवार आणि प्रकाश मेहता यांचा मुद्दा आजही गाजला. या मुद्द्यावर आजही विरोधक आक्रमक आहेत. वाट्टेल ते करा, सरकार माझं काही बिघडू शकणार नाही, असा बॅनर विरोधकांनी विधानसभेत फडकावला. त्या बॅनरवर मोपलवार यांचा फोटो लावण्यात आला होता.