मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (cm uddhav thackeray यांनी सहकुटुंब नवनीत राणांना खणखणीत इशारा देणाऱ्या फायर आजींची भेट घेतली आहे. मुंख्यमंत्र्यांनी परळमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा शिंदे या 80 वर्षांच्या फायर आजींची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे पुत्र तेजस ठाकरे यांच्यासह भेट घेतली. यावेळेस फायर आजींच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियाचं घरात स्वागत केलं. स्वागतानंतर मुख्यंमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी आजींच्या पाया पडले. (cm uddhav thackeray and family visited to 80 years old shiv sainik chandrabhaga shinde home at parel) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजींच्या घरच्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांचं स्वागत केलं. यावेळेस मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी आजींच्या शेजाऱ्यांनी एकच गर्दी केली. मुख्यमंत्र्याच्या समर्थनाथ घोषणा देण्यात आल्या. "आले शंभर गेले शंभर, मुख्यमंत्री एक नंबर", अशा घोषणा देण्यात आल्या.



उद्धव ठाकरे यांनी आजींची आणि त्यांच्या कुटुंबियांची आपुलकीने चौकशी केली. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आजींना शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर येण्याचं आमंत्रणही दिलं.


...अशी झाली आजींची एन्ट्री


नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर (मातोश्री)  हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली. यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य रंगलं होतं. मात्र वयाच्या 80 व्या वर्षी या आंदोलनात चंद्रभागा शिंदे यांनी नवनीत राणा यांनी खणखणीत इशारा दिला. 


"आमच्या साहेबांच्या बंगल्यावर येण्याची हिम्मत कशी झाली. शिवसेना कधी घाबरत नाही. आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. करेंगा, आम्ही डरेंगा नाही", असे म्हणत शिवसैनिक फायर असल्याच आजींनी सांगितलं आणि राणा दाम्पत्याला इशाराच दिला.  इतकंच नाही तर आज्जींनी पुष्पा स्टाईल करुन दाखवली. 


दरम्यान राणा दाम्पत्याविरुद्ध  चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.