मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या रडारवर आहेत. त्यांची गेल्या काही तासांपासून चौकशी सुरु असताना या बाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं कळतंय. नवाब मलिक यांच्या ईडी चौकशी नंतर ही चर्चा झाली. ( Nawab Malik's questioning by the Enforcement Directorate )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री हे ईडीच्या रडारवर आहेत. गृहमंत्री वळसे पाटील (HM Walse patil) आणि  सीएम ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या या विषयावर चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता राज्य सरकार विरुद्ध भाजप (BJP vs Mahavikas Aghadi) यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


आज दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट होण्याची देखील शक्यता आहे. महाविकासआघाडीतील मंत्र्यांवर कारवाई झाल्यास महाविकासआघाडी काय भूमिका घेते यावर राज्यातील जनतेचं लक्ष लागून आहे.


मलिक यांच्या चौकशीनंतर ईडीच्या कारवाईवर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. ईडीकडून काय कारवाई होते. ईडी मलिक यांना अटक करणार की चौकशीनंतर सोडून देणार याकडे ही लक्ष लागलं आहे. 


दरम्यान ईडीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपडून सुडबुद्धीने ही कारवाई सुरु असल्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.