दीपक भातुसे, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सुरू केलेल्या लढ्याला राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) पाठिंबा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यासह सर्व मंत्र्यांनी मलिक यांचे या लढ्याबद्दल कौतुक केल. मुख्यमंत्र्यांनी Good going असे म्हणत नवाब मलिक यांचे कौतुक केले आहे. नवाब मालिक यांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी. स्वतः मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांनाअ अशी सूचना केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या चर्चेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर ते चर्चेत आले. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.


दुसरीकडे भाजपने देखील आता नवाब मलिकांविरोधात मोर्चा उघडला आहे. भाजपकडून देखील नवाब मलिक यांच्यावर आरोप केले जात आहेत.