मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधत आहे. कोरोनाच्या काळात जनतेने कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केलं आहे. कोरोनाने थोडा अवतार बदलला आहे. तो झपाट्याने बदलत आहे. हा कोरोना व्हायरस आता आपलं रुप बदलतं आहे. युरोप आणि इंग्लंडमध्ये आजपर्यंत नव्हता तसा लॉकडाऊन करण्यात आलं. आर नॉट असा प्रकार कोरोनाचा झाला आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही निर्णय नाही
- व्हॅक्सीन आलं तरी मास्क लावणं बंधनकार 
- अजून आपण धोक्याच्या वळणावर आहोत 
- दिवाळीनंतर अधिक काळजी घ्या 
- दुसरी, तिसरी जी लाट येतेय ती त्सुनामी आहे की काय? असं वाटतंय 
- शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. असाच उत्तम प्रतिसाद नागरिकांनी दिला तर आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो. 
- घाई घाई काही केलं तर विकास होतोच असा नाही. त्यामुळे अति घाई करणं हे काही विकासाचं साधन नाही.
- मी माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे. 
- आरे कारशेडसाठी जंगल मारत मारत खतम करायचं हे योग्य नाही. 
- आधीच्या प्रस्तावात स्टेबलिंग लाईनचा पर्याय नव्हता.
- कांजुरमार्गची जागा ओसाड आहे. कांजुरला मात्र ३,४ आणि ६ या तीन लाईनची कारशेड आपण करू शकतो. आरेमध्ये फक्त ३ चे कारशेड होणार आहे. 
- आरेमध्ये कारशेडचा निर्णय घेतला तर ते कमी कालावधीसाठी होईल. पण जर कांजुरला केलं तर ते ५० ते ६० वर्षे चालणार.
- ज्यावेळी इंतर केंद्रांचा विषय येतो तेव्हा आपण खळखळ न करता सोडवतो. 
- जनतेची जागा जनतेच्या पिढीसाठी वापरली गेली पाहिजे. 
- मुंबईची तुंबी झाली हे वापरणं बंद करा. मुंबईची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे हे समजून घेतलं पाहिजे.
 - हा कद्रूपणा सोडायला पाहिजे. विरोधी पक्षाला मला सांगायचं की, तुमचं श्रेय तुम्हाला द्यायला तयार आहोत. पण इथे माझ्या इगोचा विषय नाही.
- जनतेच्या सेवेसाठी सत्ता मागत असतो. राहिलेली काम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी निवडून येतो. 
- विकासाला वेळ लागला तरी चालेल पण दूरगामी विचार करून विकास करायचा नाही. खोटे विकास नको. यामध्ये वेळ आणि पैसाही जातो. जे काही करू ते विचार करून करू. 
- भावी पिड्यांचा विचार करून विकास करा. 



मुख्यमंत्र्यांनी साधला महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद