उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
मुंबई : राज्यात 18 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या लॉकडाऊनदरम्यान रेड झोन, कन्टेंन्मेट झोन वगळता इतर भागात काही उद्योग, दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात येतील. या चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आपण कोरोनाविरोधातील हे युद्ध लढून जिंकणारच असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाल्यानंतर आता राज्यात ५० हजार उद्योग प्रत्यक्ष सुरु झाले. पाच लाख लोक कामावर परतले आहेत.
- राज्यात उद्योगांचं नवं पर्व सुरु करु, परवडत नसल्यास उद्योगांसाठी भाडेतत्वावर जमीन देऊ, नव्या उद्योगांसाठी ४० हजार एकर जमीन राखीव, मात्र उद्योगांमधून प्रदूषण होऊ देऊ नये.
'भूमिपूत्रांनो महाराष्ट्राला आत्मनिर्भर करा, उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा भासून देऊ नका'
- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाची साखळी तोडली नसली तरी कोरोनाच्या वाढीवर, गुणाकारावर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे.
- बीकेसीमध्ये 1 हजार बेड्सचं ओपन रुग्णालय सुरु करण्यात आलं आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी आपण स्वयंपूर्ण आहोत. बेड्सची कमतरता भासणार नाही. ऑक्सिजनसह अडीच लाख बेड्स उभारणार, वांद्रे, मुलुंड, गोरेगावसह महाराष्ट्रात १४२४ कोविड सेंटर्स केअर सेंटर्स उपल
- रुग्णसेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांनी स्वत:हून पुढे या.
- आतापर्यंत जवळपास ५ लाख मजूरांना आपापल्या राज्यात ट्रेन, बसेसने पाठवण्यात आलं.
- मजूरांनी चालत आपल्या गावी जाऊ नये, चालत जाताना अपघात होण्याचा मोठा धोका आहे. आतापर्यंत जसं त्यांना घरी पाठवण्यात आलं तसंच हळू-हळू उरलेल्या मजूरांनाही सोडणार आहे.
- राज्यातील ज्या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही, ग्रीन झोन आहे तिथे कोरोना पसरवायचा नाही. त्यामुळे पुणे-मुंबईत राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन, आवश्यक असेल तरच आपल्या गावी जा, आपल्यामुळे गावं बाधित करु नका, गावी गेल्यानंतर क्वारंटाईन होणं गरजेचं
- सतत हात धुवत राहा, तोंडावर मास्क लावायचं आहे. एकमेकांपासून अंतर ठेवून राहायचं आहे. पुढील काही दिवस सावधगिरीने राहायचं आहे. सर्वांनी शिक्त पाळली, मात्र ही शिस्त अधिक कडकपणे पाळण्याची गरज आहे.
- घरात राहा, सुरक्षित राहा...घराबाहेर राहा, सावध राहा