मुंबई : Uddhav Thackeray : देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचारात जोरदार रंगत आली आहे. अनेक राजकीय पक्षांनी मतांसाठी आश्वासनांची खैरात केली आहे. विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडत असताना मोठी बातमी हाती आली आहे.  एका करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ( CM Uddhav Thackeray Ranked Among Top Five ) यांचा क्रमांक देशातील पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये आला आहे. मात्र, भाजपचा एकही मुख्यमंत्री टॉप 5 मध्ये नसल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या टीकेला उत्तर देण्याचे टाळले आहे.  आता  महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसाठी चांगली बातमी आहे. देशात टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे.  त्यामुळे टीकाकारांना पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेतून आली आहे.


देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी व्होटरने 'मूड ऑफ द नेशन' या आधारवर सर्व्हे केला. 2022 मधील हा ताजा सर्व्हे आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यातून ही माहिती पुढे आली आहे.


 टॉप-5 मध्ये पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 5 व्या क्रमांकावर आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत. तर टॉप-10 मध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सातव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, आठव्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि  नवव्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत.  


कोणत्या मुख्यमंत्र्यांना किती रेटींग ?


सर्व्हेत कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती रेटिंग मिळाले यावर मुख्यमंत्र्यांची क्रमवारी ठरवली गेली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना  सर्वाधिक 71.1टक्के रिटिंग मिळाले. दुसऱ्या क्रमांकाला 69.9 टक्के, तिसऱ्या क्रमांकाला 67.5 टक्के, तर चौथ्या क्रमांकावर 61.8 टक्के रिटिंग मिळवत महाराष्ट्राते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  टॉप 5मध्ये आले आहेत. त्यानंतर 5 व्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना 61.8 टक्के रिटिंग मिळाले आहे.


दरम्यान, टॉप 10 मध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकच मुख्यमंत्री आहे. ते आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा आहेत. त्यांना 56.6 टक्केच रेटिंग मिळाले आहे. भाजपची ज्या राज्यात सत्ता आहे तेथील मुख्यमंत्र्यांना चांगले रेटींग मिळालेले नाही. गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केवळ 40 टक्क्यांपेक्षा कमी रेटींग मिळाले आहे. त्यामुळे भाजपसाठी हा सर्व्हे आत्मचिंतन करायला लावणार आहे.