मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार खासदांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाबद्दल चर्चा होईल अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादात अडकलेले वनमंत्री संजय राठोड या बैठकीत उपस्थित नव्हते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची पहिल्यांदाच एकत्रित बैठक झाली आहे. 


दरम्यान संजय राठोड हे बैठकीत गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय राठोड कुठे आहेत ? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत का उपस्थित नव्हते ? त्यांच्यासंदर्भात बैठकीत काय चर्चा झाली ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान संजय राठो़ड यांच्याबद्दल बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 



संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी पक्षात दोन गट पाहायला मिळत आहेत. काही नेते संजय राठो़ड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. तर काही राजीनामा घेऊ नये असे म्हणत आहे. संजय राठोड यांची बाजू बैठकीत येणे गरजेचे होते. पण उपस्थित नसल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे.