कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयीची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली, तरी त्यांना लगेच हॉस्पिटलमधून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली नसल्याचं सांगितलं जात आहे. झी २४ तासच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची २ आठवड्यापूर्वी सर्जरी झाली होती. पण अजूनही त्यांना डिस्चार्ज दिला जात नाहीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आणखी काही दिवस उपचार सुरु राहणार आहेत. ४ दिवसात डिस्चार्ज मिळेल असं सांगण्यात येत होतं, मात्र २ आठवड्यानंतरही डिस्चार्ज मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी कार्यकर्त्यांमध्ये काळजी वाढली आहे.


डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली, उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास होत असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील हरकिशनदास रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.