मुंबई :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी 5 वाजून 07 मिनिटांनी निधन झाले. 10.30 च्या सुमारास बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात आलाय आहे."असा अलौकिक शिवआराधक होणे नाही. शिवशाहीर शिव चरणी लीन. पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरी) 


 



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दात आदरांजली अर्पण केली आहे. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भावना व्यक्त केल्या. (Babasaheb Purandare | राज ठाकरे जेव्हा बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतात) 


 


'एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावूक होऊन दिली.