मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा होणार नाही. अन्नधान्याचा साठा आहे. रेशनचं वाटप होणार आहे. मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. दिवस पुढे जात आहेत तसा हा शेवटचा आणि निर्णायक टप्पा आहे. सर्दी खोकला असल्यास, परदेशातून आले असल्यास कोणतीही माहिती लपवू नका. रुग्ण बरे होत आहेत, त्यामुळे यापासून पळू नका, आता अटीतटीचं युद्ध आहे. आपण सगळे धैर्याने तोंड देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली नाही. कोरोनाचं मोठं संकट आहे. हे संकट गेल्यानंतर मोठं आर्थिक संकट येणार आहे. आर्थिक घडी मोडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. कोणाचाही पगार कपात केलेला नाही. त्याची टप्याटप्प्याने विभागणी केली आहे. 


त्याशिवाय, खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मजूरांनी स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही.अनेक मजूर आपल्या गावी जात आहेत. मात्र आता त्यांना जाता येणार नाही. राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मजूरांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे मजूरांनी बाहेर जाऊ नये असंही ते म्हणाले. 


कोरोनाचं हे युद्ध आहे. यात संयम आणि आत्मविश्वासाची गरज आहे. हे युद्ध आपण जिंकणारच असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.