मुंबई : 'पुढील मराठी भाषा दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच', अशी गर्जना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. (CM Uddhav Thackeray on Marathi Bhasha Din) मराठी भाषेचं प्रेम केवळ मराठी भाषा दिनालाच उचंबळून येणं चुकीचं आहे. मराठी आपल्या रोमारोमात भिनलेली भाषा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी, माझी मातृभाषा आपल्या अभिमानाचा विषय आहे. तो जपणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले.  छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतील फारसी शब्द कमी करून मराठी राजभाषाकोश तयार केला. आपणही मराठी भाषाकोश सोप्या भाषेत का नाही करत? असा सवाल त्यांनी केला. 



आज मराठी दिवस मराठी हा दिवस इतर दिवसां प्रमाणे साजरा करताना साहित्य क्षेत्रातील व्यक्ती या कडे कसे बघतात, खरंतर मराठी जागवण्यासाठी आणि मायबोली ला टिकवण्याठी अनेक महाराष्ट्रातील संत, थोर पुरुष, साहित्यिक , कवी यांचा मोलाचं योगदान आहे. त्या पार्श्वभूमीवर पद्मश्री पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवी ना.धो.महानोर यांची प्रतिक्रिया झी24 तास ने जाणून घेतली आहे.