मुंबई : आपण सगळ्यांनी उत्सव सामाजिक जाणीव ठेवून संयम पाळला. हळूहळू पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करत आहोत. उद्योगधंदे वाढीसाठी हळूहळू परवानगी देत आहोत. सण, पाऊस मध्ये कोरोनाचं संकट वाढत आहे. संपूर्ण जगात दुसरी लाट येतेय अशी भीतीदायक चित्र पुढे येत आहे. मुंबईत आता रुग्ण संख्या २००० हजारांवर वाढत आहे. पुणे, सांगली, सातारा ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'


कोरोनाचा धोका वाढल्याने खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवली जाणार आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लस कधी येणार माहिती नाही. डिसेंबर-जानेवारीपर्यंत लस येईल अशी आशा. गर्दीत मास्क लावा. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


आमदार, खासदार, नगरसेवक प्रत्येकाने आपल्या भागाची जबाबदारी घ्यायची आहे. व्हायरस पोहोचण्याआधी त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. 


गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये ही अपेक्षा आहे. मुंबईत शिथिलता येत आहे. मास्क वापरले जात नाहीत. इतर देशात कायदे कडक केले आहेत. दंड आकारले जातात. काही गोष्ट कायद्यानेच करण्याची गरज आहे का? काही ठिकाणी कायदे कडक करावे लागणार आहेत. वागण्यात शिथिलता येता कामा नये. पुढे संकट येतील. त्याचा सामना करण्यासाठी तयार व्हायचं असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.