मुंबई : घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला शिकवू नये, आमचं हिंदुत्व गदाधारी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. दादागिरी कशी मोडायची हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. बेस्टच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी भोंग्यावरून सुरू असलेल्या वादाचा समाचार घेतला. मास्क काढून लवकरच नवहिंदुत्ववाद्यांचा समाचार घेऊ, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही मुंबईसाठी काम करतो, आम्ही विकास करतो. आमच्यात आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये हाच फरक आहे. बाबरी पाडली तेव्हा शिवसैनिक होते हे आम्हाला शिकवणाऱ्यांना सांगायचे आहे. आज बांधणीच्या वेळी ते आता इतरांसमोर जल्लोष करत आहेत. हिंदूंना घंटा नको, आम्ही गदा असलेले हिंदू आहोत. मातोश्रीवर यायचे असेल तर बरं या, दादागिरी चालणार नाही. आता नकली नवहिंदु तेरी कमीज.'


'कोरोनात 2 वर्ष गेली, मग माझी शस्त्रक्रिया झाली मग अनेक कामाचं लोकार्पण आणि उदघाटन करता आलं. बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. मी 315 आणि 316 बसने जात असे, 87 बसनेही प्रवासही करत असे. आयुष्याचा प्रवास कुठून कुठे जाईल सांगता येत नाही. कोरोना काळात बेस्टच्या कामाचं कौतुक. मुख्यमंत्री अनेक झाले होतील, मात्र बिरुद कोणतं लागत ते महत्वाचे. एकाच पक्षात निष्ठेने काम केलं की तिकीट मिळेल.'


'मुंबई बस स्टॉपचं मॉडेल केंद्र सरकारने मागितले. राजकीय किती बोलावं याच ताळतंत्र असावं. हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. दादागिरी कशी मोडायची हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. लवकरच जाहीर सभा घेणार आहे.'


'मला सोक्षमोक्ष लावायचा आहे, एकदा समाचार घ्यावा लागेल तो घेणार. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे.... हनुमानाच्या गदेसारखी. लवकरच मी सभा घेणार.... आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचा आहे.'


'ज्यांच्या पोटात मलमळत आहे जळजळत आहेत त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही.'