मुंबई : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे.  त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेसोबतच राज्यातील आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारची देखील चिंता वाढली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना वाढल्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री म्हणाले, 'लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असे ते यावेळी म्हणाले.



शिवाय, कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय पण मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला  कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.