मुंबई : कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बैठकीत उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. याआधी शरद पवार यांनी ही उद्धव ठाकरे यांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्या संवादात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लढण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आता हे राजकीय मैदान सोडण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये. याआधीही पवारांच्या वतीने उद्धव ठाकरेंना हाच सल्ला देण्यात आला होता.


दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी असल्य़ाचं त्यांनी म्हटलं आहे.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे ठाकरे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारकडून सरकार वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याची शक्यता आहे.