राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार
उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे.
मुंबई : राज्यात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असून, राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांत पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. काल रात्री नाशकात तापामान 8 अंशांवर उतरलं. तर मुंबईतल्या सांताक्रूझ वेधशाळेनं उपनगरातलं किमान तापमान साडे तेरा अंश नोंदवलं.
थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं
उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं आहे.
महाराष्ट्रात इस्टर्न वारे परत वाहतील
पुढील आठवड्यात महाराष्ट्रात इस्टर्न वारे परत वाहतील त्यामुळे थंडी कमी होईल. जानेवारीत बहुतेक वेळा तापमान कमी होते, असं कुलाबा वेधशाळा संचालिका शुभांगी भुत्ते यांनी सांगितलं.