मुंबई : राज्यातील विद्यापीठं आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापक आणि इतरांची रिक्त असलेली 4738 पदं लवकरच भरली जातील, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीये. तासिका तत्वावर असलेल्या अध्यापकांच्या मानधनातही वाढ करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविद्यालयांमध्ये अनेक पदं रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. त्यामुळे तासिका तत्वावर अध्यापक भरती न करता आता थेट अध्यापकांची भरती केली जाणार आहे. 


सध्या राज्यातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापकांच्या 3580 जागा रिक्त आहेत. तर शारिरीक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा रिक्त आहेत.