मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणी ४३ जणांची तक्रार
मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. या प्रकरणी आतापतर्यं जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.
मुंबई : मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. या प्रकरणी आतापतर्यं जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.
आरोपीच्या शोधासाठी नवघर पोलिसांचं तपास पथक दिल्लीला रवाना झाले आहे. मुलुंड नवघर रोड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये हा कार्ड क्लोनिंगचा प्रकार घडला आहे.
सोमवारी ३५ खातेदारांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले. मंगळवारी तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत अंदाजे २० लाखांहून अधिक रक्कम खात्यांतून काढून घेण्यात आली आहे. दरम्यान तक्रारदारांचा आकडा १०० हून अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.