मुंबई : युवक काँग्रेसच्या नेत्यांनी घाटकोपरच्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात घुसुन फुल फेको आंदोलन केलं.. गुजरातमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं.


 भाजपनं गुंडशाही चालवली असली तरी काँग्रेस गांधीजींच्या मार्गाने प्रेरित असल्याचं यावेळी युवा काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं.. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालतील फोटोही फाडले.. दरम्यान या कार्यालयात भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसही नव्हते.