काँग्रेसकडून विधानपरिषदचे उमेदवार जाहीर
काँग्रेसकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर झाले आहेत.
मुंबई : काँग्रेसकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर झाले आहेत. डॉ. वजाहत मिर्झा आणि शरद रणपिसे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. रणपिसे सध्या विधानपरिषदचे आमदार असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मिर्झा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान शिवसेनेनंही विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. अॅडव्होकटे अनिल परब आणि मनीषा कायंदे यांची नाव निश्चित असून, त्यांची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.