मुंबई : राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा असून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसने केलाय. 


सरकारकडून कर्जमाफीबाबत फसवणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीत ४३ लाख शेतकऱ्यांची १२ हजार कोटी रुपयांवर बोळवण झाल्याचे आकडे काँग्रेसने समोर आणलेत. ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. मात्र प्रत्यक्ष केवळ ४२ लाख शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलंय. 


राजू शेट्टींचाही हल्लाबोल


आज शिवाजी महाराज असते, तर राज्यसरकारला कडेलोटाची शिक्षा केली असती, अशी टीका आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केलीय. धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जेजे रुग्णालात उपचार सुरू आहेत.धर्मा पाटील यांच्यावर ही वेळ आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी शेट्टींनी यावेळी केली. 


शेतक-यांवर अन्याय


सरकारची भूमिका शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची आहे असं विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे धर्मा पाटील यांच्या जिल्ह्यातल्या सरकारमधल्या मंत्र्यांची कामं तातडीनं होतात. पण, पाटलांना मात्र जीव धोक्यात घालावा लागतो हे लाजिरवाणं असल्याचंही विखे यावेळी म्हणाले.