मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित झालाय. सोलापूरमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दिलीप माने २००९ ते २०१४ या काळात दक्षिण सोलापूरचे आमदार होते. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही होते.


राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालं पद


नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिला होता. नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे.


राणेंच्याऐवजी काँग्रेसनं उमेदवार मैदानात उतरवला असला तरी भाजपकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार का? तसंच काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचं समर्थन असेल का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.