एका पोस्टरवर राजीव गांधींचा द्वेष, तर दुसरीकडे भाजपकडून वाजपेयींना श्रद्धांजली
पोस्टरवर लिहिलंय `राजीव गांधी, द फादर ऑफ मॉब लिंचिंग`
मुंबई : देशात पोस्टत राजनीती जोरात सुरू झालीय. मुंबई काँग्रेसनं लावलेल्या एका पोस्टरवर भाजपचे नेते आणि दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यात आलीय... तर दुसरीकडे एक पोस्टर तेजिंदर पाल सिंह बग्ग यांच्याकडून लावण्यात आलंय. यावर राजीव गांधी यांचा फोटो आहे आणि त्यावर लिहिलंय... 'राजीव गांधी, द फादर ऑफ मॉब लिंचिंग'...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रणव झा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हो दोन्ही पोस्टर पोस्ट केलेत. 'काँग्रेस भाजपहून कशी वेगळी आहे, ते पाहा... काही वेळ वाट पाहा, लवकरच जनता तुम्हाच्या अहंकार आणि द्वेषाला योग्य प्रत्यूत्तर देईल... संस्कारातील फरक' असं कॅप्शन त्यांनी या दोन्ही फोटोंना दिलंय.
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता हा संघर्ष आणखी तीव्र होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. नुकतंच, जोधपूरमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेदरम्यान आपापसांत भिडलेले दिसले होते.