मुंबई : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशभरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिळक भवन दादर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष फटाके, मिठाई वाटत, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.


राहुल यांच्याकडे सूत्र


राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल १६ वर्षे अध्यक्षपद सांभाळल्यावर कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्या यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपवली. 



प्रमुख नेते व्यासपिठावर


राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असताना सोनिया गांधी,  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, गुलाम नभी आझाद, यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक प्रमुख नते व्यासपीठावर उपस्थित आहेत.


काटेरी मुकूट 


स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे.


राहुल गांधी तो कसा सांभाळतील याबाबत कॉंग्रेसच नव्हे तर, देशासह जगभरातील राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.