दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून अशोक चव्हाण यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर तब्बल आठवडाभरानंतर अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण, २६० जणांचा मृत्यू


२४ मे  रोजी अशोक चव्हाण यांचा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर चव्हाण यांना रुग्णवाहिकेने नांदेडवरून मुंबईत आणण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा इतर बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडल्या जात आहेत. तर प्रत्यक्ष होणाऱ्या बैठकीमध्येही कमी उपस्थिती आणि योग्य ते अंतर पाळलं जात आहे. एवढं करूनही मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. 


देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला- राहुल गांधी


यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. जितेंद्र आव्हाडांच्यावेळी राज्य सरकारकडून बरीच गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात असतानाही फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.