मुंबई :  राज्यातील प्रदेश कॉंग्रेसमध्ये दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. कारण ऊर्जा खाते कॉंग्रेसचे नितीन राऊत काँग्रेसकडे असताना राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप आणि घरगुती वीज जोडणी पूर्वसूचना न देता कापणे, शेतकऱ्यांचे नुकसान होणे याबाबत  काँग्रेसची लक्षवेधी आज विधान सभेत येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉंग्रेसचे नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, कुणाल पाटील या काँग्रेस आमदार बरोबर भाजप आमदारांची ही लक्षवेधी मांडण्यात येणार आहे. ऊर्जा खाते नितीन राऊत यांच्याकडे आहे आपल्याच मंत्र्यांविरोधत वीज तोडणी बाबत काँग्रेसची लक्षवेधी येणार आहे.


राज्यातील कॉंग्रेसमध्ये नितिन राऊत विरूद्ध नाना पटोले यांच्यातील सुप्त संघर्ष मागील काळात चर्चेचा विषय ठरला होता. त्यात आता लक्षवेधी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता.


-


 काँग्रेस मंत्र्यांमध्ये अंतर्गत फेरबदलाची शक्यता? हे होणार विधानसभा अध्यक्ष?


विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर राज्यपालांनी अद्याप सही केलेली नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झालाय. राज्यपालांनी नियमांवर बोट ठेवून आवाजी मतदानाचा प्रस्ताव फेटाळला तर ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होईल.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 10 मार्चनंतर राज्यात बदल होतील असं मध्यतंरी म्हटलं होतं. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनेच घेण्याचा आग्रह धरला तर निवडणुकीत काही गडबड होऊ नये यासाठी नाना पटोले यांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय.