नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीसाठी बोलणी करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. के सी वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे आणि अहमद पटेलही मुंबईकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सायंकाळी 4 पर्यंत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेना नेत्यांना देखील बोलावण्यात येणार आहे. पण त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यात एक मत झाल्यानंतर शिवसेनेशी बोलू असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आल्याचं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी काँग्रेसने आपल्याला आणखी वेळ न मिळाल्याने, शिवसेनेला पाठिंब्यावर विचार करण्यात वेळ गेल्याचं म्हटलं आहे. मात्र शिवसेनेची सत्तास्थापन करण्याची दाव्याची वेळ संपल्याने, राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं आहे.