नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी दिल्लीतून पुढे येत आहे. शिवसेना-राष्ट्रवादीबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांचे सरकारमध्ये ऐकलं जात नाही, अशी काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे. शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून द्यावी, सरकार किमान समान कार्यक्रमावर चालावं. कट्टरता आणि धार्मिक अजेंडा घेता येणार नाही, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी मंत्र्यांना केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४ तासला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर बैठक झाली. प्रदेशाध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. 


सरकारमध्ये निर्णय घेताना आणि काम करताना अडचणी येत आहेत. अधिकारी नियुक्तीचे अधिकार दिले जात नाही. अशी काँग्रेस मंत्र्यांची नाराजी आहे.


काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक काँग्रेस मुख्यालयात पार पडली.  काँग्रेस मंत्र्याचं प्रगती पुस्तक पक्षश्रेष्ठींनी तपासलं. सरकार चालवताना कोणत्या अडचणी येत आहेत, यावरही चर्चा झाली. अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी केली.