मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या विनंतीनंतर विरोधी बाकावर बसलेल्या भाजपकडून विधासभा अध्यपदासाठीचा किसन कथोरे यांच्या नावे भरण्यात आलेला अर्धिकृतपणे मागे घेण्यात आला. ज्यानंतर महाराष्ट्राच्या परंपरेनुसार या पदाची निर्विवादपणे विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यामुळे नाना पटोले यांनी रविवारी विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारच्या घडामोडींचा संदर्भ आणि अध्यक्षपदासाठीच्या अर्जांची माहिती देत निवड प्रक्रियेविषयीचं चित्र स्पष्ट करत नाना पटोले यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली. ज्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त मंत्री जयंत पाटील हे नाना पटोले यांना शुभेच्छा देत त्यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत घेऊन आले. 


विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड


औपचारिक घोषणेनंतर नाना पटोले अध्यक्षपदी विराजमान होताच, त्यांनी पदभार स्वीकारला आणि सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीलाच पटोले यांनी वातावरणातील खेळीमेळीचं वातावरण आणि सभागृहातील सदस्यांचा एकंदर उत्साह पहाता, 'मी सांगतो तेवढंच ऐकायचं....' असं म्हटलं. त्यांचे हे उदगार ऐकता सत्ताधारी, विरोधी आणि सभागृहात उपस्थित सर्वांमध्ये एकच हशा पिकला. 



अध्यपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आणि भाजपविरोधी आक्रमक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पटोले यांचं सर्व नेत्यांनी स्वागत केलं. एकंदरच बिनविरोधपणे निवडून आलेल्या या अध्यक्षांच्या किरकिर्दीची सुरुवात चर्चेचा विषय ठरली हे खरं.