मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम असल्याचे पुढे येत आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्यासाठी पत्र पाठविलीत. मात्र, यात तांत्रिकबाब सांगून राजभवनने पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे  काँग्रेस - राष्ट्रवादीची पत्रे राजभवनाला मिळाली नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा घोळ वाढला आहे. परंतु तत्वत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. मात्र, अधिकृत पत्र देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हा घोळ निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेनेला पाठिंबा देणारं पत्र राष्ट्रवादीने राजभवनवर पाठवले होते. फॅक्सद्वारे पाठिंब्याचं पत्र राजभवनवर पाठवण्यात आले. मूळप्रत नंतर राजभवनला पोहोचवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी वेळ वाढवून मागितली, मात्र राज्यपालांनी ती फेटाळली, परंतु आमचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळला नाही, अशी माहिती शिवसेना युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.



राज्यातील सत्तासिंहासनाच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता आणखीनच वाढला आहे.