`किमान समान कार्यक्रम`साठी आधी काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा - अजित पवार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी किमान समान कार्यक्रमाची सुरूवात कशी होणार हे सांगितलं आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी किमान समान कार्यक्रमाची सुरूवात कशी होणार हे सांगितलं आहे. सुरूवातीला यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकत्र चर्चा करणार आहेत. त्यात आज जयंत पाटील आणि बाबासाहेब थोरात संपर्क करतील आ़णि चर्चा कधीपासून आणि कशी करायची हे ठरवणार आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.
या बैठकीत किमान समान कार्यक्रम, पदांचे आणि खात्यांचे वाटप याबाबत चर्चा होणार आहे. ही माहिती नंतर हायकामंडला कळवण्यात येणार आहे. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा होणार आहे, आणि अजून काहीही ठरलेलं नाही, तरी देखील तुम्ही काहीही ब्रेकिंग न्यूज चालवतात, असं देखील अजित पवार पत्रकारांना म्हणाले.
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी चर्चेसाठी 5 जणांची समिती देखील नेमण्यात आली आहे, त्या समितीतील सदस्य खालील प्रमाणे आहेत.
चर्चेसाठी राष्ट्रवादीची 5 जणांची समिती
जयंत पाटील
अजित पवार
छगन भुजबळ
धनंजय मुंडे
नवाब मलिक
—————
चर्चेसाठी काँग्रेसची 5 जणांची समिती
बाळासाहेब थोरात
पृथ्वीराज चव्हाण
अशोक चव्हाण
विजय वडेट्टीवार
माणिकराव ठाकरे