मुंबई :  राज्याचे माजी न्यायमंत्री, माजी लोकसभा आणि राज्यसभा खासदार तसेच खेडचे माजी आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (Hussain Dalwai Death) यांचं निधन झालं आहे. दलवाई यांनी मुंबईत जगाचा निरोप घेतला.  ते 99 वर्षांचे होते. दलवाई यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (congress senior leader and ex minister husain dalwai passed away)


हुसेन दलवाई यांच्याबाबत थोडक्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलवाई यांचा राजकारणातील दांडगा अनुभव होता. त्यांनी आमदार, खासदार,  कॅबिनेट मंत्री अशी अनेक पद यशस्वीरित्या भूषवली. दलवाई यांनी 1962 ते 78 या कालावधी दरम्यान खेड विधानसभा मतदारसंघातं प्रतिनिधित्व केलं. 


दलवाईंनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. यानंतर त्यांना संसदेत राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. मे 1984 मध्ये त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली.


राज्यसभेत संधी मिळाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनतेनी त्यांना निवडून दिलं. 


विविध क्षेत्रातून शोक व्यक्त 


हुसेन दलवाई यांच्या निधनामुळे अनेक स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शोक व्यक्त केला. सचिन सावंत यांनी दलवाई यांच्यासोबतचा 3 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.