मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते (Mlc Lop) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या निवडीवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची ठिणगी पडलीय. दानवेंच्या निवडीवर नाराजी व्यक्त करत, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) दिलेत. काँग्रेस खरंच आघाडीतून बाहेर पडणार? पाहूयात हा रिपोर्ट. (congress state president nana patole has given hint to leave the mahavikas aghadi over to mlc lop)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे अजित पवार विधानसभेतले विरोधी पक्षनेते झाले. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेच्या अंबादास दानवेंची निवड झाली. कोणतीही चर्चा न करता परस्पर दानवेंची निवड झाल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 



विधान परिषदेचं उपसभापतीपदही आधीपासूनच शिवसेनेकडं आहे. त्यामुळं काँग्रेसच्या हातात काहीच उरलेलं नाही. अशा परिस्थितीत नाराज काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत.


आघाडीसाठी काँग्रेसनं नव्हे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचं सांगून नाना पटोलेंनी थेट निर्वाणीचाच इशारा दिलाय. तर दुसरीकडं विधिमंडळात बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून निर्णय होतात...आम्हाला आता वाद वाढवायचा नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.


विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवानंतर महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप झाले. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची धुसफूस आणखी वाढलीय. प्रत्येक बाबतीत तिन्ही पक्षांचं एकला चालो रे धोरण दिसतंय. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं शिवबंधन तुटलंय की काय अशी चर्चा सुरू झालीय.