मोठा दिलासा! राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट
राज्यातली कोरोना रूग्णांची संख्या (corona patient) सातत्याने घटत आहे. (Coronavirus In Maharashtra ) दिवसभरात 9 हजार 350 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले.
मुंबई : राज्यातली कोरोना रूग्णांची संख्या (corona patient) सातत्याने घटत आहे. (Coronavirus In Maharashtra ) दिवसभरात 9 हजार 350 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर मुंबईत केवळ 572 नव्या कोरोनाग्रस्तांची (Coronavirus) नोंद झाली. 24 तासांमध्ये राज्यात 388 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 15 हजार 176 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या राज्यभरात 1 लाख 38 हजार 361 कोरोना रूग्ण आहेत.
दिवसभरात 388 बाधितांचा मृत्यू
आज दिवसभरात 9 हजार 350 नवीन कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आज एकूण 15 हजार 176 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. तसेच, आज दिवसभरात 388 बाधितांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यातील मृत्यूदर 1.93 टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 69 हजार 179 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.69 टक्क्यांवर पोहोचले आहे.
धारावीत पुन्हा कोरोनाचे शून्य रूग्ण
तर दुसरीकडे मुंबईसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आज दुसऱ्या दिवशी धारावीमध्ये कोरोनाचे शून्य रूग्ण नोंदवले गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 2 फेब्रुवारीपासून आतापर्यंत धारावीतील हे मोठे यश आहे. धारावीत सध्या फक्त अकराच अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये दोन जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोना पसरू नये यासाठी, महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. आणि महापालिकेच्या या प्रयत्नांना यश आले आहे.