मुंबई : Sanjay Raut against Contempt petition : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena Leader  Sanjay Raut) यांना न्यायालयावर टीका करणे भोवण्याची शक्यता आहे. कारण राऊत यांच्या विरोधात बार असोसिएशनची याचिका दाखल केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सौ. रश्मी ठाकरे यांनाही प्रतिवादी या याचिकेत करण्यात आले आहे. (Indian Bar Association files contempt petition-cum-PIL against Sanjay Raut, others for levelling allegations against HC judges)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका उच्च न्यायालयात इंडियन बार असोसिएशनने दाखल केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांना न्यायालयाकडून झुकतं माप दिलं जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.


न्यायालयाने सुमोटो अवमान याचिका दाखल करुन राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यासोबत, दैनिक 'सामना'च्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनाही याचिकेत प्रतिवादी आहेत. याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.