मुंबई : मुंबईच्या देवनारमधले शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या श्रीमुखात लगावण्यात आलीय.  त्यामुळे शिवसेनेतले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिका-यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली, मात्र काही महिलांना हे मान्य नव्हतं. 


...आणि श्रीमुखात भडकावली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री देवनारमधल्या एका कार्यक्रमात राजेंद्र राऊत स्टेजवरुन उतरले, त्यावेळी काही महिलांनी त्यांच्याशी वाद घातला... एका महिलेनं थेट राऊत यांच्या थोबाडीत लगावली असता महिला राजेंद्र राऊत यांच्याशी वाद घालू लागले आणि त्यातच एका महिलेने राजेंद्र राऊत च्या कानाखाली वाजवली आणि धक्का बुक्की सुरू झाली. 


या प्रकरणाला घेऊन रात्री उशिरापर्यंत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नाट्य सुरू होते मात्र दोन्ही बाजूने नमते घेतल्याने पोलीस ठाण्यात मात्र तक्रार दिली नसली तरी शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे सिनेटची निवडणूक 100 टक्के यशस्वी पणे निवडून आले असले तरी अजूनही सेनेत अंतर्गत वाद आहे हे या घटनेवरून दिसत आहे.