मुंबई : दिग्दर्शक प्रवीण तर्डे यांच्या 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. मुळशीतल्या गुन्हेगारीवर आधारित या चित्रपटाचं 'आ..रा..रा' हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं. मात्र आता हे गाणं हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण मोक्का सारखे गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना घेऊन हे गाणं शूट करण्यात आलंय. कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ, मुळशीतला आणखी एक कुख्यात गुन्हेगार विठ्ठल शेलार हे या गाण्यात प्रवीण तरडेंबरोबर नाचतांना दिसत आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या माध्यमातून गुन्हेगारीचं उदात्तीकरणं करण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. तसेच बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीलाही गुन्हेगारांचा पुळका आलायं, का असाही सवाल विचारला जात आहे.