मुंबई : मुंबईत आज ठंडा ठंडा कूल कूल वातावरण अनुभवायला मिळतंय. गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत थंडीचा कडाका जाणवतोय. पण आजचा गुरूवारचा दिवस यंदाच्या डिसेंबरमधला सगळ्यात कूल दिवस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे १५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या जानेवारी महिन्यात पारा यापेक्षा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे.


आगामी ख्रिसमस आणि वर्षाअखेरीला मुंबई चांगलीच गारठेल असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईतलं धुरकंही कमी झाल्याचं दिसून येतंय. तर आर्द्रता जवळपास ७५ टक्यांपर्यंत आलीय.