कोरोनाची ही टेस्ट फक्त 9 रुपयांत, मुंबई पालिकेचा मोठा निर्णय
Corona antigen test : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा राज्यात शिरकाव झाला आहे. (Coronavirus New Variant Omicron) पुन्हा कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
मुंबई : Corona antigen test : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा राज्यात शिरकाव झाला आहे. (Coronavirus New Variant Omicron) पुन्हा कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाबत राज्याची चिंता वाढली आहे. कारण कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला आहे. आता कोरोनाची अँटीजन टेस्ट केवळ नऊ रुपयांत करण्यात येणार आहे. याचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे.
दरम्यान, राज्यात आर काऊंट वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पुणे ठाण्याचा आर काऊंट एक पेक्षा पुढे गेला आहे. त्यामुळे या शहरांत कोरोना संक्रमणचा धोका वाढला आहे. यामुळे आता कोरोना चाचणीवर भर देण्यात येणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.
आता मुंबई महापालिका अँटीजन चाचण्यांचे 20 लाख कीट घेणार आहे. एका चाचणीचा केवळ 9 रुपये दर असणार आहे. केवळ अर्ध्या तासातच चाचणीचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेचा अँटीजन चाचण्यांसाठी प्रस्ताव ठेवला आहे. (Corona antigen test at just Rs 9, big decision of Mumbai Municipal Corporation) दक्षिण आफ्रिका, युरोप या देशांमध्ये थैमान घालणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे आतापर्यंत दोन बाधित रुग्ण मुंबईत आढळून आलेत. तरीही खबरदारी म्हणून महापालिकेनं कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यासाठी 20 लाख अँटीजन चाचण्यांचे कीट खरेदी केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे केवळ नऊ रुपयांमध्ये ही चाचणी होऊन अर्ध्या तासांमध्ये अहवाल हातात पडणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला. लवकरच स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.