मुंबई : मुंबईत गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची 10 हजारांचा आकडा ओलांडला आहे. आज मुंबईत 10,030 नवे कोरोना रूग्ण वाढले असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेचं कारण बनली आहे. राज्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह इतर प्रमुख शहरे आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालली आहे. मुंबईची दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. रुग्णांच्या आकडेवारीसह मृतांचा आकडा ही वाढत आहे.



राज्यात सोमवारपासून नवे निर्बंध लागू झाले आहेत. सकाळी संचारबंदी तर रात्री कर्फ्यू लागू आहे. शनिवार आणि रविवार हा पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. असं असलं तरी आजही बऱ्याच ठिकाणी मोठी गर्दी दिसत आहे. लोकांमध्ये नियम पाळण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे संसर्ग वाढत आहे.